गेली अनेक महिने ग्रामसेवक भरतीची वाट पाहणाऱ्या (Gramsevak Bharti) उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. जिल्हा परिषदेतर्फे ग्रामविकास विभाग अंतर्गत तब्बल 10 हजार पदांसाठी भरती केली जाणार आहे. यासंदर्भात शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. प्रत्येक गावात ग्रामसेवक हा महत्वाची जबाबदारी संभाळत असतो. सरकारी नोकरीसोबतच गावाची सेवा करण्याची संधी या पदावरील व्यक्तीला मिळते.


Gram Sevak Recruitment 2023 – Vacancy Details 
ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट-क मधील सर्व संवर्गाची (वाहनचालक व गट- ड संवर्गातील पदे वगळून) सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त (Gramsevak Bharti) पदांच्या ८०% मर्यादेपर्यंत रिक्त पदे भरण्यात येणार आहे.
सदर मान्यता ही वित्त विभागाच्या निर्देशानुसार दि. १५ ऑगस्ट, २०२३ पर्यंत लागू राहील.
त्यापुढील भरती प्रक्रिया वित्त विभागाचा शासन निर्णय दि. ३० सप्टेंबर, २०२२ नुसार सुधारित आकृतिबंध शासनाने मान्य केल्यावरच करता येणार आहे.
जिल्हा परिषदांतील गट-क मधील सर्व संवर्गाची (वाहनचालक व गट-ड संवर्गातील पदे वगळून) रिक्त पदे संवर्गनिहाय आरक्षण नियमानुसार निश्चित करून जिल्हा परिषदांनी त्यांच्या स्तरावर जिल्हा निवड मंडळामार्फत परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक देण्यात आले आहे.

Important Dates – Maharashtra Gramsevak Bharti 2023
काही महत्वाच्या तारखा – (Gramsevak Bharti)
१ ते ७ फेब्रुवारी २०२३ दरम्यान पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे.
त्यानंतर पुढे २२ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येतील.
२३ फेब्रुवारी ते १ मार्च २०२३ दरम्यान अर्जाची छाननी करण्यात येणार आहे.
तर २ ते ५ मार्च २०२३ दरम्यान पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे.
६ ते १३ एप्रिल २०२३ दरम्यान पात्र उमेदवारांना प्रवेशपत्र उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तर १४ ते ३० एप्रिल २०२३ या कालावधीत ऑनलाइन/ऑफलाइन माध्यमातून परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे.


Maharashtra Gramsevak Recruitment 2023
या वेळापत्रकाचे सर्व जिल्हा परिषदांना पालन करावे (Gramsevak Bharti) लागणार आहे. त्याकरिता रिक्त पदे (एकूण रिक्त पदांच्या ८०% मर्यादेपर्यंत), त्यांची आरक्षण निश्चिती, उमेदवारी अर्ज मागविणे, सदर परीक्षेच्या आयोजनासाठी कंपनी निवडणे (आवश्यक असल्यास), परीक्षा घेण्यासंबंधीची सर्व जबाबदारी हीजिल्हा निवड मंडळाची व जिल्हा परिषदेची असेल.


महाराष्ट्र शासनाची अधिकृत वेबसाइट www.maharashtra.gov.in वर याचा अधिक तपशील देण्यात आला आहे. त्याचा संकेताक २०२२१११५११२३०३६७२० असा आहे.

ग्रामसेवक आणि ग्रामविकास पदे रद्द होणार, याऐवजी एकच पद निर्माण होणार. समितीने सहा महिन्यांच्या आता अहवाल सादर करावा, अशा सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी दिल्या आहेत. 

ग्रामसेवक (Gram sevak) आणि ग्रामविकास अधिकारी ( Village Development Officer) पदाकरिता परीक्षा देणाऱ्या इच्छुकांसाठी महत्त्वाची बातमी आहे.
ग्रामसेवक आणि ग्रामविकास आधिकारी ही पदं लवकरच रद्द होणार आहेत.
याऐवजी पंचायत विकास अधिकारी हे एकच पद निर्माण केले जाईल.
यासंबंधीची मागणी ग्रामसेवक संघटनेकडून अनेक दिवसांपासून होत होती.
त्यानुसार, राज्य सरकारनेदेखील ही पदे रद्द करून एकच पद तयार करण्यासाठीची तयारी सुरु केली आहे.
नाशिक येथील विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेसाठी यासाठीची समिती नेमण्यात आली आहे.
रद्द झालेल्या दोन्ही पदांची वेतनश्रेणी, पदोन्नती आदी बाबींचा सविस्तर अभ्यास या समितीतर्फे केला जाईल आणि त्यानुसार नवीन पदासाठीचे नियम ठरवले जातील.
समितीने सहा महिन्यांच्या आता अहवाल सादर करावा, अशा सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी दिल्या आहेत.
Gram Vikas Adhikari Bharti 2022 | Gram Vikas Adhikari Vacancy 2022

..या गोष्टींचा अभ्यास करून निर्णय होणार 

ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पद रद्द करून नवे पद निरमाण करण्याची आवश्यकता आणि त्याची कारणमीमांसा करण्याची जबाबदारी या समितीवर देण्यात आली आहे.
तसेच ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक यांची स्वतंत्र वेतनश्रेणी असल्याने एकच पद निर्माण केल्यास अनुज्ञेय वेतनश्रेणीचा अभ्यास केला जाईल.
तसेच वेतन, वेतन श्रेणी, कालबद्ध पदोन्नती, वित्तीय परिगणना आणि इतर बाबींचा अभ्यास करून शासनाला सहा महिन्याच्या मुदतीत अहवाल सादर करणार आहे.

समितीत कोण कोण?  👇👇

नाशिक विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक, मुख्य वित्त व लेखाधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य), जिल्हा परिषद-नाशिक, उपमुख्य वित्त व लेखाधिकारी, जिल्हा परिषद-नाशिक, ग्रामसेवक एकनाथ ढाकणे, राज्य. ग्रामसेवक संघटनेच्या महाराष्ट्र प्रतिनिधींची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), जिल्हा परिषद, नाशिक यांची सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

Maharashtra Gram Sevak Bharti 2022

ग्रामसेवक भारती 2022: जिल्ह्यात ग्रामसेवक संवर्गात सुमारे 250 पदे रिक्त आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण ८२३ ग्रामपंचायती केवळ ५७८ ग्रामसेवक सांभाळत आहेत. पुढील तपशील पुढीलप्रमाणे:-

 ग्राम सेवक जॉब्स 2022 मग तुमच्या मित्रांसाठी चांगली ताजी बातमी. ताज्या बातम्यांनुसार, महाराष्ट्र सरकार येत्या काही दिवसांत ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अंतर्गत 400 हून अधिक रिक्त पदांची अधिसूचना प्रसिद्ध करणार आहे. महाराष्ट्रातील ग्रामसेवक आणि ग्राम पंचायत भारती 2022 पुढील तपशील या पृष्ठावर अपडेट होतील आमच्या साइटवर स्तब्ध रहा आणि तुम्ही ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेच्या सुरुवातीच्या तारखेबद्दल रोजच्या नोकर्‍या सूचनांसाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये देखील सामील होऊ शकता. अधिकृत वेबसाइट https://rrd.maharashtra.gov.in ग्राम सेवक विचार २०२२.

जिल्ह्यातील ग्रामसेवक संवर्गातील सुमारे 250 च्या जवळपास पदे रिक्त आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण 823 ग्रामपंचायतींचा डोलारा केवळ 578 ग्रामसेवक सांभाळत आहेत.

ग्रामसेवकावर दोन ते तीन तर काहींवर चार ग्रामपंचायतींचा प्रभार आहे, परिणामी, ग्रामसेवक एक दिवस या ग्रामपंचायतीमध्ये, तर दुसऱ्या दिवशी त्या ग्रामपंचायतीमध्ये कर्तव्य बजावत असतात. मागील काही वर्षांपासून ग्राम सेवक भरती झाली नाही. याउलट अनेक ग्राम सेवक सेवानिवृत्त झाले. त्यामुळे रिक्त पदांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे ग्रामसेवकांची रिक्त भरण्यात यावी अशी मागणी ग्रामसेवक संघटने कडून अनेकदा करण्यात आली.
सिंदेवाही तालुक्यातील ग्रामसेवकांची रिक्त पदे भरण्यात न आल्यामुळे विकास कामे खोळंबली आहेत. सिंदेवाही पंचायत समितीअंतर्गत 50 ग्रामपंचायती असून, या ग्रामपंचायतींचा कारभार 22 ते 24 ग्रामसेवक सांभाळत आहेत. याच 24 ग्रामसेवकांपैकी दोन-तीन ग्रामसेवक पंचायत समितीच्या कार्यालयात दत्तक असल्यासारखे आहेत. 
पांढरकवडा तालुक्यातील ग्रामसेवकांची रिक्त पदे भरण्यात न आल्यामुळे येथे विविध पदे रिक्त रिक्त आहेत. पांढरकवडा पंचायत समिती अंतर्गत 74 ग्रामपंचायती असून, या ग्रामपंचायतीचा कारभार केवळ 48 ग्रामसेवक सांभाळत आहेत.

Gram Sevak Recruitment 2022
तालुक्यातील ग्रामसेवकांची रिक्त पदे भरण्यात न आल्यामुळे विकासकामे खोळंबली आहेत. पांढरकवडा पंचायत समिती अंतर्गत 74 ग्रामपंचायती असून, या ग्रामपंचायतीचा कारभार केवळ 48 ग्रामसेवक सांभाळत आहेत. या 48 ग्रामसेवाकांपैकी दोन-तीन ग्रामसेवक पंचायत समितीच्या कार्यालयात दत्तक असल्यासारखे आहेत. त्यामुळे उर्वरित असल्यासारखे आहेत. त्यामुळे उर्वरित ग्रामसेवक 74 ग्रामपंचायतीचा कारभार कसा सांभाळत असतील, हा संशोधनाचा विषय आहे.