BSF Bharti 2022-23 : सीमा संरक्षण दलात विविध पदांसाठी भरती सुरु; लवकर अर्ज करा 
BSF Bharti 2022-23 : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BSF म्हणजेच सीमा संरक्षण दलाअंतर्गत पशु वैद्यकीय सहायक सर्जन या पदांसाठी भरती सुरु झालेली असून ऑनलाईन पध्दतीने यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. विद्यार्थ्याना विहित मुदतीमध्ये योग्यप्रकारे ऑनलाईन फॉर्म या भरतीसाठी भरायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जानेवारी 2023 आहे.

BSF Recruitment 2022-23 : यासंदर्भातील सविस्तर जाहिरात https://bsf.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरती देण्यात आलेली आहे. या भरतीबद्दलची संपूर्ण माहिती व जाहिरात खाली देण्यात आली आहे. काळजीपूर्वक संपूर्ण माहिती वाचूनच अर्जदारांनी अर्ज करावा ही विनंती.


एकूण पदे : 20

रिक्त पदाचे नाव, पदसंख्या व शैक्षणिक पात्रता :

✔ पशु वैद्यकीय सहायक सर्जन – 20 पद

शैक्षणिक पात्रता : उमेदवाराकडे पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन या विषयातील बॅचलर पदवी किंवा समतुल्य पदवी असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : 23 ते 30 यादरम्यान वय असलेले पात्र विद्यार्थी या पदासाठी अर्ज करू शकतात.

🛑 परीक्षा फीस : 400/- रु.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 जानेवारी 2023






How To Apply For BSF Bharti 2022-23
वरील पदाकरिता उमेदवारांना ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे.
उमेदवारांनी अर्ज करतांना काळजीपूर्वक सर्व माहिती जसे पद, शैक्षणिक पात्रता इत्यादी तपासूनच अर्ज करावा.
अर्जाची थेट लिंक वरील तक्त्यामध्ये देण्यात आली आहे, त्या लिंकवरून उमेदवार अर्ज करू शकतात.
अर्ज विहित मुदतीत म्हणजेच 09 जानेवारी पर्येंतच 2023 ऑनलाईन सादर करावा.
अधिक माहितीसाठी वरील PDF संपूर्ण काळजीपूर्वक पाहावी.