CGST & Customs Pune Bharti :

केंद्रीय कर आणि सीमा शुल्क विभागा पुणे अंतर्गत विविध पदावर भरतीची जाहिरात निघाली आहे.

यासाठी खाली नमूद केलेल्या तारखे अगोदर खालील लिंकवरील विहित नमुन्यात अर्ज सादर करायचे आहेत.
पदांचा तपशील
कर सहाय्यक – दोन जागा
स्टेनोग्राफर ग्रेड II – सहा जागा
हवालदार – तीन जागा
शैक्षणिक पात्रता
दहावी ते पदवीधर
वेतन (CGST & Customs Pune Bharti)
18000 ते 81100
वयोमर्यादा
मूळ जाहिरात वाचावी
(Application Fees) अर्जाचे शुल्क
नाही
अर्ज करण्याची शेवटची तारीख
2 जानेवारी 2023 संध्याकाळी 05:00 वाजेपर्यंत
अर्ज पाठवण्याचा पत्ता
सहायुक्त-मुख्य आयुक्त, केंद्र जीएसटी आणि कस्टम पुणे झोन यांचे कार्यालय, जीएसटी भवन, वाडिया कॉलेज समोर, 41-ए, ससून रोड, पुणे-411001

उमेदवारासाठी महत्त्वाच्या सूचना

उमेदवार साठीचे नियम,अटी व अर्ज केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाचे अधिकृत संकेतस्थळावर
उपलब्ध असतील तथा पुणे विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरून सुद्धा डाऊनलोड करू शकता.
ही भरती स्पोर्ट्स कोट्या अंतर्गत असल्यामुळे संबंधित मूळ जाहिरात वाचूनच अर्ज सादर करावेत.
वर नमूद केलेली पदे ही तात्पुरते स्वरूपाची असली तरी कायमस्वरूपी होऊ शकतात उमेदवारी कालावधी दोन वर्षाचा राहील.
स्टेनो-दोनच्या पदासाठी अर्ज करणाऱ्या खेळाडूंना त्यांच्या क्रीडा प्रकाराच्या मैदानी चाचणीच्या एक दिवस आधी स्टेनो कौशल्या चाचणीसाठी हजर राहावे लागेल.
स्टेनो कौशल्य चाचणी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची निवड केली जाईल आणि केवळ ते यशस्वी उमेदवार त्यांच्या क्रीडा प्रकाराच्या मैदानी चाचणीसाठी जातील.
Steno कौशल्य चाचणीत अनुत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचा निवडीसाठी विचार केला जाणार नाही.
सर्व बाबतीत रीतसर भरलेला अर्ज बंद लिफाफ्यात असावा.
अर्ज दिनांक 2 जानेवारी 2023 संध्याकाळी पाच वाजेपर्यंत किंवा त्यापूर्वी वरील पत्त्यावर स्पीड पोस्टद्वारे सादर करावेत.
पूर्वोत्तर राज्य अंदमान व निकोबार द्वीप समूह लक्षद्वीप जम्मू आणि काश्मीर येथे राहणाऱ्या उमेदवारांच्या अर्ज
वरील पत्त्यावर दिनांक 09 जानेवारी 2023 रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पोहोचावेत.
शेवटच्या तारखे नंतर प्राप्त झालेल्या अर्ज कोणते परिस्थितीत विचारात घेतले जाणार नाहीत.👇👇👇👇