Grampanchayat maha e gram citizen connect app launch – खुशखबर! ग्रामपंचायतमधील सर्व दाखले घरबसल्या मिळणार. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाचा उपक्रम. सर्व दाखले आता तुम्ही तुमच्या मोबाईल वरती पाहू शकता जसे की जन्मदाखला, मृत्यू दाखला, विवाह नोंदणी दाखला, तसेच घरपट्टी पानपट्टी, कर भरण तुम्ही मोबाईल ॲपच्या माध्यमातून पाहू शकणार आहात

महाराष्ट्र शासनाकडून ऑनलाइन पद्धतीने नागरिकांना घरबसल्या कशा सुविधा देता येईल याकडे लक्ष दिले जात आहे. यापूर्वी केवळ जमिनीचा सातबारा उतारा ऑनलाइन पद्धतीने काढला जात होता. मात्र, यापुढे मोबाइल अॅप्लिकेशनच्या माध्यमातून गावठाणमधील जागेचा उतारा, ग्रामपंचायतीमध्ये मिळणारे जन्म प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र यासारखे अनेक दाखले मिळणार आहेत. सोबतच ग्रामपंचायत सदस्यांची माहिती, आपण यापूर्वी कराचा भरणा केलेल्या सर्व कराच्या रकमेची माहिती या अॅपच्या माध्यमातून मिळणार आहे.
महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग व पंचायत राज विभागामार्फत महा ई ग्राम सिटिझन कनेक्ट नावाचा एकमोबाइल अॅप्लिकेशन अॅप लाँच केला आहे. हा अँप आपल्या मोबाइलमध्ये इंस्टॉल करून गावातील नागरिक घरबसल्या ग्रामपंचायतीमधून मिळणारे दाखले काढू शकतात. त्यामुळे त्यांची वेळेची बचत होणार असून, दाखल्याकरिता ग्रामपंचायतीला फेन्या माराव्या लागणार नाहीत. “Grampanchayat maha e gram citizen connect app launch”

वेळेतच त्यांना घरबसल्या दाखले मिळणार आहेत, तर ग्रामपंचायतीला या माध्यमातून नागरिकांकडून मिळणारा गृहकर वसूल करणे सोयीचे झाले असल्याने ग्रामपंचायतीला गृहकर वसुलीत येणाऱ्या अडचणी दूर होण्यासमदत होणार आहे.

Certificates On Your WhatsApp – ऑनलाइन सेवा : पुणे महापालिकेकडून नागरिकांसाठी सुविधा. दाखले मिळणार ‘व्हॉट्सअॅप’वर, पुणे महापालिकेकडून नागरिकांना अनेक सुविधा ऑनलाइन देण्यात येतात. मात्र, आता संकेतस्थळावर जाऊन किंवा अॅप डाउनलोड करण्याची गरज पडणार नाही.

8888251001 हा मोबाईल क्रमांक तुमच्या फोनमध्ये सेव्ह करा आणि मेसेज टाकून तुम्हाला हव्या असलेल्या दाखल्याची सॉफ्ट कॉपी मिळवता येणार आहे. पहिल्या टप्प्यात बुधवारपासून (ता. 7) मिळकतकरासंदर्भातील सेवा सुरू केली आहे. पुढील काळात जन्म-मृत्यू दाखला, पाळीव प्राणी दाखला यासह इतर सेवा दिल्या जाणार आहे. अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी संगणक विभागाच्या उपायुक्त प्रतिभा पाटील, साहाय्यक आयुक्त राहुल जगताप उपस्थित होते. (Certificates On Your WhatsApp)

सेवा हमी कायद्यानुसार नागरिकांना सर्व प्रकारचे दाखले लगेच देणे आवश्यक आहे. अनेक नागरिकांना संकेतस्थळ वापरता येत नाही, तसेच संकेतस्थळावर गेले, तर संबंधित विभाग निवडून त्याची प्रक्रिया करण्यासाठी बराच वेळ लागतो, त्यामुळे हे दाखले घेण्यासाठी नागरिकांना महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जावे लागते. आता ही दाखले मिळविण्याची प्रक्रिया सुटसुटीत करण्यासाठी ‘व्हॉट्सअॅप बॉट’ ही सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. बिनवडे म्हणाले, “नागरिकांना सहजतेने सर्वप्रकारचे दाखले मिळावेत, यासाठी महापालिकेने व्हॉट्सअँप बॉट’ ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात मिळकतकरासंदर्भातील दाखले, पावती व इतर सुविधा उपलब्ध आहे.

मिळकतकर विभागाकडे नागरिकांचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाकल्यास किंवा प्रॉपर्टी क्रमांक टाकल्यास सर्व माहिती उपलब्ध होईल. तसेच, यावरूनलगेच संकेतस्थळावर जाऊन बिलदेखील भरता येणार आहे.’ उपायुक्त पाटील म्हणाल्या, “सध्या केवळ व्हॉट्सअँप बॉट वर मिळकतकर विभागाची सेवा उपलब्ध होत असली, तरी पुढच्या टप्प्यात पाणीपट्टी, जन्म मृत्यू दाखला, बांधकाम दाखला, पाळीव प्राणी दाखला यासह इतर सर्व प्रकारचे दाखले मिळणार आहे.

एका व्यवहारासाठी 50 पैसे शुल्क
महापालिकेने यासाठी थेट व्हॉट्सअॅपच्या मेटा कंपनीशी करार केला आहे. दाखल्याची माहिती घेणे, ती तपासून दाखला मिळवणे ही सर्व प्रक्रिया 24 तासांत पार पाडली गेली, तर महापालिकेकडून प्रति व्यवहार 50 पैसे इतके शुल्क व्हॉट्सअॅप घेणार आहे. यासाठी नागरिकांना कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही, असे बिनवडेयांनी सांगितले. {Certificates On Your WhatsApp}

2019 पूर्वीचे दाखले मिळणार

जन्म व मृत्यू दाखल्यांसाठी 2019 नंतर केंद्र सरकारच्या सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीमचे (सीआरएस) सॉफ्टवेअर वापरले जात आहे. त्यामुळे 2019 नंतरच्या जन्म व मृत्यू दाखल्यांची माहिती महापालिकेच्या सर्व्हरवर उपलब्ध नाही. ही माहिती उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, त्यामुळे व्हॉट्सअप क्रमांकावर 2019 पूर्वीचेच जन्म व मृत्यू दाखले उपलब्ध होणार आहेत.